७ वर्षांपूर्वीचं दुकानाचं नाव ठेवलं होत ‘कोरोना’, आता ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । केरळमधील एका व्यक्तीचं दुकान आपल्या वस्तुंमुळे नाही तर नावामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. जगभरात पसरलेल्या या महामारीच्या ७ वर्षाआधीच या व्यक्तीने आपल्या दुकानाचं नाव ‘कोरोना’ ठेवलं होतं. महत्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षात जेवढं दुकान चर्चेत आलं नाही तेवढं आता आलं आहे.

कोट्टयमचे जॉर्ज या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी ७ वर्षांआधी या दुकानाचं नाव कोरोना ठेवलं होतं. पण त्यांना त्यावेळी जराही अंदाज नव्हता की, एक दिवस या नावाने जग घाबरेल आणि याच नावाने दुकान चर्चेत येईल. त्यांनी सांगितलं की, कोरोना महामारीनंतर त्यांच्या दुकानात लोक जास्त येऊ लागले आहेत.

जॉर्ज यांनी सांगितले की, ‘कोरोना हा एक लॅटिन शब्द आहे. ज्याचा अर्थ क्राउन(मुकूट) असा होतो. मी सात वर्षांआधी माझ्या दुकानाचं हे नाव ठेवलं होतं. आता हे नाव व्यापारासाठी फायदेशीर ठरत आहे’. या दुकानात तुम्हाला किचन, वार्डरोबचं सामान, प्लांट आणि पॉट मिळतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in