अखेर केतकी चितळेला जामीन मंजूर

Ketki Chitle
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेली अभिनेत्री केटकी चितळे हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणात (Atrocty) जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने हा जामीन 25 हजार रुपये जात मुचलक्यावर मंजूर केला आहे.

केतकीकडून अनेक दिवासांपासून जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. याआधीच्या सुनावणी नंतर न्यायालयानं केतकीला पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. अखेर आज न्यायालयानं २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर केतकी ला जामीन मंजूर केला.

नेमकं काय होत प्रकरण?

1 मार्च 2020 मध्ये केतकी चितळे हिने एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यामध्ये तिने धर्माचा उल्लेख केल्याने ती पोस्ट अधिक व्हायरल झाली होती. नवबौध्द लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनास येतात. अशी पोस्ट तिने सोशल मीडियावरती शेअर केली होती. याप्रकरणी स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर केतकीला ताब्यात घेण्यात आलं होतं.