बडे दिलवाला..!’KGF’ सुपरस्टार यशची ३०० बेरोजगार मजुरांसाठी कोट्यावधींची मदत; खात्यात जमा झाले पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख असणारा कन्नड सुपरस्टार आणि KGF फेम यश पडद्यावर जितका दमदार आहे, ख-या आयुष्यात तितकाच जिगरबाज आणि दयाळू. तसा तो त्याच्या अभिनयासाठी निश्चितच कौतुकाचा पात्र आहे. मात्र सध्या त्याचे चाहते त्याचे कौतुक एका वेगळ्या कारणामुळे करताना थकत नाहीयेत. यशने तसेच काहीस काम केलय. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत काम करणा-या ३ हजार कामगारांना यशने मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत रोजच्या कामावर हजेरी घेऊन काम करणा-या ३ हजार कामगारांसाठी त्याने तब्बल १.५ कोटी दान करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनंतर प्रत्येक वर्करच्या अकाऊंटमध्ये त्याने प्रत्येकी ५ हजार रूपये ट्रान्सफर केले जाणार असल्याचे सांगितले होते आणि त्याने बोलल्याप्रमाणे हे करूनही दाखवलं आहे.

https://www.instagram.com/p/CPlEivwnMXK/?utm_source=ig_web_copy_link

याआधी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले कि, ‘कोव्हिड १९ ने संपूर्ण देशातील असंख्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. आपली कन्नड फिल्म इंडस्ट्रीही प्रभावित झालीये. या कठीण काळात मी माझ्या कमाईतून 3 हजार कामगारांच्या खात्यात या महिन्यात प्रत्येकी 5 हजार रूपये ट्रान्सफर करणार आहे. या कठीण परिस्थितीत ही मदत फार मोठी नाही. हा समस्येवरचा तोडगा नाही, हे मला माहित आहे. पण हा आशेचा किरण आहे. येणारा काळ चांगला असेल, अशी आशा आहे.’

कोरोनामुळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री देखील ठप्प आहे. या इंडस्ट्रीत रोजंदारी अर्थात दिवसाच्या हजेरीवर काम करणारे अनेको कामगार कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले आहेत. हे सारे कामगार आपल्या कुटुंबासह आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशात यशने केलेली ही मदत त्यांच्यासाठी मोठा आशेचा किरण आहे.

https://www.instagram.com/p/CKoT5A5nR-l/?utm_source=ig_web_copy_link

यशचा ‘केजीएफ-चॅप्टर २’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या शिवाय या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज हे कलाकार देखील अन्य महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट येत्या १६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. कन्नडशिवाय हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Leave a Comment