खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड.

खंडाळा येथे आशा सेविका, आरोग्य सेविका यांना कोरोना योद्धा म्हणून खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सन्मानपत्र वितरित करण्यात आले.या वेळी हा कार्यक्रम खंडाळा पंचायत समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात घेत असताना हे सन्मान पत्र माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सातारा मनोज पवार यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र अहिरे, शिरवळ, शिवाजीनगर, लोणंद येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.अविनाश पाटील यांनी साथीच्या रोगा सबंधी मार्गदर्शन केले.तसेच यावेळी मनोज पवार यांनी ही कोरोना योद्ध्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

कोरोना सारख्या महामारी या आजारावर मात करण्यासाठी रुग्ण सेविका आशा व वैद्यकीय दवाखान्यातील सर्व कर्मचारी अधिकारी यांचे खूप मोठे सहकार्य लाभले असे मत स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्राचार्य सुरेश खराटे यांनी व्यक्त केले.

एका सामाजिक जाणिवेतून हा पुरस्कार देण्यात येत आहे.कोरोना सारख्या महामारी च्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा शासकीय प्रशासकीय अधिकार्‍यांचा कर्मचारी यांचा सहभाग असल्यामुळे आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकलो.असे मनोगत जयकुमार खरात यांनी व्यक्त केले.यावेळी स्मारक समितीचे संजय जाधव, उत्तम वाघमारे. दत्तात्रय  कडाळे,मनोहर जावळे, यशवंत खुंटे, तात्यासाहेब गायकवाड असे स्मारक समितीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व मान्यवर तसेच कोरोना योद्धा म्हणून संबधित विभागातील सर्व सेवक सेविका सर्व कर्मचारी वर्ग अधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like