हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी आज खेड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आज परब यांच्याबाबत खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. न्यायालयाने दिलासा देत परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परब यांच्या जामिनासाठी त्यांचे वकील सुधीर बुटाला यांची जामिनासाठी केला होता. अर्ज दाखल त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर करण्यात आला.