हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदवीत्तर विभाग या पदांसाठी होणार आहे. या पदाच्या एकूण 181 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी आता उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. (Khed Shikshak Prasark Mandal Pune Bharati 2024) त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांनी 26 एप्रिल, 27 एप्रिल आणि 30 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे.
एकूण रिक्त पदांची संख्या
या भरती अंतर्गत 181 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे खूप गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
ही निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता | Khed Shikshak Prasark Mandal Pune Bharati 2024
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे 410503
मुलाखतीची तारीख
26 एप्रिल, 27 एप्रिल आणि 30 एप्रिल 2024 रोजी मुलाखत आयोजित केलेले आहेत
निवड प्रक्रिया
- ही भरती उमेदवारांसाठी मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज आणि कागदपत्रांसह संबंधित पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे.
- मुलाखतीसाठी येण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.