हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता.
मोदी म्हणाले की, देशभरातील नागरिकांकडून मला खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या भावनांचा सन्मान करत, खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
देश को गर्वित कर देने वाले पलों के बीच अनेक देशवासियों का ये आग्रह भी सामने आया है कि खेल रत्न पुरस्कार का नाम मेजर ध्यानचंद जी को समर्पित किया जाए। लोगों की भावनाओं को देखते हुए, इसका नाम अब मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार किया जा रहा है।
जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
कोण होते मेजर ध्यानचंद –
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीच्या इतिहासातील महान खेळाडू म्हणून ओळखले जातात. ध्यानचंद यांना भारतरत्न ही पदवी देण्यात यावी, यावरही बराच काळ चर्चा झाली. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे जादूगार मानले जातात.