Maruti Ertiga आवडत नसेल तर ‘ही’ 7-सीटर तुमच्यासाठी ठरेल बेस्ट डील; पहा फीचर्स आणि किंमत

kia carens
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला मारुती एर्टिगा आवडत नसेल तर ही स्वस्त 7 -सीटर खरेदी करा. जी तुम्हाला देईल मारुती एर्टिगा गाडीपेक्षाही उत्तम फीचर्स. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बाजारात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या Kia Carens गाडी बाबतची संपूर्ण माहिती जी अल्प काळातच मारुती एर्टिगाला टक्कर देत पर्याय म्हणून लोकप्रिय झाली आहे .

मारुती सुझुकी एर्टिगाने देशात सर्वाधिक विक्री होणारी MPV म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की एर्टिगा सर्वांना आवडेल. कदाचित हा आकडा खूप मोठा हि असू शकतो . पण ज्यांना एर्टिगा गाडी आवडत नाही त्यांच्यासाठी बाजारात कोणते पर्याय आहेत? याचा जर तुम्ही शोध घेतला तर त्याचे उत्तर हे फक्त आणि फक्त किआ केरेन्स हेच असू शकते . गेल्या काही महिन्यांत Kia Carens ची विक्री देखील चांगली होत आहे. फीचर्सच्या बाबतीत ते मारुती अर्टिगापेक्षाही पुढे आहे. Kia Carens ची किंमत हि Ertiga पेक्षा जास्त आहे. चला तर मग वेळ न दवडता (Kia Carens) किया कॅरेन्स गाडीची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहुयात….

इंजिन –

Kia Carens मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये, ग्राहक 160PS/253Nm जनरेट करणारे 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन, 115PS/242Nm जनरेट करणारे 1.5L पेट्रोल इंजिन आणि 116PS/250Nm जनरेट करणारे 1.5L टर्बो डिझेल इंजिन यापैकी पर्याय निवडू शकतात. MPV तीन ड्राइव्ह मोड्ससह येतो – इको, नॉर्मल आणि स्पोर्ट. हे 6iMT आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते. हे 6 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येते.

फीचर्स –

Kia Carens वैशिष्ट्ये बाबत सांगायचं झाल्यास, 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस एंड्रॉइड ऑटो, ऑटोमैटिक एसी, वायरलेस ऐप्पल कारप्ले, कनेक्टेड कार टेक, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, बोस साउंड सिस्टम, फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पेन सनरूफ, ड्राइवर-सीटर हाइट अडजस्टमेंट, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, क्रूज कंट्रोल, 64 एंबिएंट लाइटिंग, सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश होतो.

किंमत –

Ertiga ची किंमत 8.64 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.08 लाख रुपयांपर्यंत जाते, तर Kia Carens ची किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.95 लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच केर्न्स कियारा एर्टिगाच्या तुलनेत खूपच महाग आहे.