Kia Sonet नव्या अंदाजात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Kia Sonet
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त SUV Kia Sonet नव्या अपडेटसह लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या कारच्या किमतीत सुद्धा बदल झाला आहे. नवीन अपडेट्सनंतर या एसयूव्हीची किंमत जवळपास 50,000 रुपयांनी वाढली आहे. त्यानुसार कंपनीने या SUV ची सुरुवातीची किंमत 7 लाख 79 हजार रुपये ठेवली आहे. चला जाणून घेऊया Kia च्या या अपडेटेड Sonet चे खास फीचर्स….

Kia Sonet

फीचर्स-

Kia Sonet SUV मध्ये या 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन स्टार्ट आणि स्टॉप बटणे, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, एसी व्हेंट्स, क्रूझ कंट्रोल, यांसारखे फीचर्स मिळतात.

Kia Sonet

इंजिन – Kia Sonet

नवीन Kia Sonet मध्ये, कंपनीने BS6 2 1.2-लीटर क्षमतेचे नेचुरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. याशिवाय 1.0- लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन हा-स्पीड iMT किंवा सात-स्पीड DCT शी जोडले आहे. नवीन किया Sonet 2023 मध्ये दिलेले इंजिन अपडेट केले गेले आहे, हे इंजिन नवीन RDE आणि BS6 फेज 2 उत्सर्जन मानदंडांशी सुसंगत आहे जे 1 एप्रिलपासून लागू होईल. एवढेच नाही तर हे इंजिन E20 इंधनावरही चालू शकते.