व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ठाकरेंनंतर निवडणूक आयोग पवारांना धक्का देणार? राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेल्यांनतर निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) धक्का देण्याच्या तयारीत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा फेरविचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर मायावतीच्या बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय दर्जाचीही समीक्षा केली जाणार आहे.

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. खरं तर 2014 च्या लोकसभा निकालानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय कम्युनिष्ट पार्टीच्या दर्जा विषयी फेरविचार सुरु झाला होता, परंतु त्यावेळी निवडणूक आयोगने ही प्रक्रिया पुढे ढकलली होती. त्यानंतर 2019 ला सुद्धा ही प्रक्रिया आयोगाने पुढे ढकलली. मात्र आता तिन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकल्यास शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निकष काय ?

1) लोकसभेच्या किमान चार जागा जिंकणे आवश्यक
2) लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये कमीत कमी 6 टक्के मते असावी
3) किमान तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय असावा
4) कमीत कमी चार राज्यांमध्ये ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यता असावी

राष्ट्रीय पक्षाचा फायदा काय?

राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा असल्यास तो पक्ष एकाच चिन्हावर देशभर निवडणूक लढवू शकतो. परंतु राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नसेल तर मात्र त्यांना प्रत्येक राज्यात निवडणूक लढताना वेगवेगळ्या चिन्हांचा आधार घ्यावा लागतो.

राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा असल्यास पक्षाला दिल्लीत पार्टीच्या ऑफिससाठी जागा मिळते. तसेच निवडणुकीच्या काळात पब्लिक ब्रॉडकास्टर्सद्वारे ऑन एअर येण्याची संधी मिळते.