किणी, तासवडे टोलनाक्यावर दरवाढ : स्थानिकांना 315 रूपयात मासिक पास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे टोल नाके राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) वर्ग झाले असून वाहन चालकांना 10 ते 15 रुपयांची केलेली दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. तसेच स्थानिकांनाही वाहनधारकांना काही सवलतीही मिळणार आहेत. टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर परिघातील कार, जीप आदी वाहनांना 315 रुपयांत महिन्याचा पास देण्यात येणार आहे.

किणी व तासवडे टोलनाक्याची 2 मे 2022 ला टोल वसुलीची मुदत संपली होती. कोरोना व महापुराच्या कालावधीत काही दिवस टोल वसुली बंद ठेवल्याने या काळातील वसुली भरून काढण्यासाठी 53 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 24 जूनच्या मध्यरात्री संपणार असून हे दोन्ही टोल नाके राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

टोलनाक्याचे एनएचआयकडे गेल्याने आता रिटर्न टोलची सुविधाही मिळणार असून 24 तासांत परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांना 50 टक्के सवलत मिळेल. जिल्ह्यात नोंदणीकृत असणाऱ्या व्यावसायिक छोट्या वाहनांना जवळपास 50 टक्के सवलत मिळणार आहे. वीस किलोमीटर परिघातील कार, जीपसारख्या हलक्या वाहनांना 315 रुपयांत महिन्याचा पास मिळणार आहे. मालवाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे.

किणी व तासवडे टोल नाक्यावर आकारले जाणारे दर सुरुवातीचे दर एकेरी टोलचे तर कंसातील दर

दोन टोल नाके ओलांडणाऱ्या वाहनांसाठी कार, जीप 90 रुपये (135), मध्यम (एलसीव्ही) वाहने 145 (220), बस ट्रकसह अवजड वाहने 305 (460) रुपये. आतापर्यंत मल्टि अॅक्सल वाहनांना ट्रकचाच दर आकारला जात होता. आता यापुढे श्री अॅक्सल वाहनांना 335 (500), चार ते सहा अॅक्सल वाहनांना 480 (720) तर सात अॅक्सल व त्यापुढील वाहनांना 505 रु. (875) दर आकारण्यात येणार आहेत.