विश्वास नांगरे पाटील अडचणीत येणार?? सोमय्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून, नांगरे-पाटील  महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करीत आहेत असा आरोप करत त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

यावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असेल , त्यासंदर्भात सर्वप्रथम राज्य सरकारला विचारणा करुन कृती अहवाल मागविला जाईल अशी माहिती दिली आहे.

डॉ. मुळे पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत पोहचली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडेही येऊ शकते. परंतु एका शासकीय अधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला काय कारवाई झाली याबाबच अहवाल मागितला जाईल त्यांनतरचं प्रकरण आयोगाकडून हाताळले जाईल.

नेमकं प्रकरण काय आहे?

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी त्यांना बेकायदा घरात डांबून ठेवून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.याविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल केली.

Leave a Comment