Tuesday, June 6, 2023

किरीट सोमय्या जरंडेश्वर कारखान्यावर 5 ऑक्टोबरला जाणार

सातारा | चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखान्याला मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी भेट देणार असल्याची ग्वाही भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी कारखान्याच्या संचालकांच्या भेटी दरम्यान दिली. जरंडेश्वर कारखान्याच्या शिष्टमंडळाने किरीट सोमय्या यांची आज (मंगळवार) सकाळी 7 वाजता सातारा येथे भेट घेतली.

जरंडेश्वर कारखान्याची सर्व माहिती देऊन कारखान्याच्या माहितीची फाईल सोमय्या यांच्याकडे सादर केली. त्यावर त्‍यांनी मंगळवारी दि. 5 रोजी जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असल्याची ग्वाही कारखान्याच्या संचालकांना दिली. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांचा सहभाग असून लवकरच हेही प्रकरण आपण पुढे नेवू असे किरीट सोमय्या म्हणाले.

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या हे चिमणगाव येथे जावून कारखान्यांची पाहणी करणार आहेत.