आधी उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवरून टीका, नंतर थेट कोलांटीउडी; सोमय्यांची पत्रकारांपुढे सारवासारव

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर मानेच्या दुखण्यावरून टीका केली. त्यानंतर आपण अस बोललोच नाही अस म्हणत सारवासारव देखील केली. मुख्यमंत्री पैसे मोजत होते म्हणून त्यांची मान दुखली अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. स्वत: च्या बायकोचे बेकायदेशीर बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी ते व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी व्यस्त होते.  त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती.

पण त्यानंतर काही तास उलटायच्या आतच सोमय्यांनी कोलांटीउडी मारली. मी त्यांना त्यांच्या मानेच्या दुखण्यावरून काही बोललोच नाही अस म्हणत त्यांनी पलटी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. यासाठी मी प्रार्थना करेन. ते आधी आमच्यासोबतच होते पण त्यांनी आता हिरवा रंग परिधान केला असला तरी ते भगवेधारीच आहे, असं सोमय्या म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here