Multibagger Stock : ‘या’ Multibagger Stock ने एका वर्षातच दिला 450% रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेअर मार्केट मध्ये काही निवडक शेअर्स हे मंदीतही आपल्या गुंवणूकदारांचे तारणहार बनतात. असाच एक शेअर यावर्षीच्या हिंडेनबर्ग प्रकारानंतरही शेअर बाजारात तग धरून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत MULTI BAGGER ठरला आहे. ज्याचे नाव आहे ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड’ . हा शेअर तब्बल एका महिन्यात 45 % नी वाढला असून ह्याच वर्षी गुंवणूकदारांना ह्या शेअरने भरभरून परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात ह्या स्टॉक ने गुंतवणूकदारांना एकूण ४५०% इतका रिटर्न दिला आहे.

LIC ची एकूण हिस्सेदारी –

किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड’ ह्या कंपनीत LIC ची १.२६% इतकी हिस्सेदारी आहे. गेल्या सोमवारी ह्या शेअरने आजवरची सर्वोच्च किंमत नोंदवली होती तर मंगळवारी हा शेअर १ % ने घसरत ११९. १० रुपये प्रति शेअर ह्या दरावर स्थिरावला.

1 लाख रुपये बनले 5.5 लाख रुपये –

किर्लोस्कर शेअरने त्यांच्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी गुंतवलेले १ लाख रुपयांचे ५. ५ लाख रुपयांत परावर्तित करत जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. १ जानेवारी पासून जर कोणी या शेअर मध्ये १. ४५ लाख रुपये गुंतवले असते तर आजच्या घडीला ते १. ८५ रुपयांत परावर्तित झाले असते.

LIC ची एकूण हिस्सेदारी

LIC ची ह्या शेअर मध्ये १. २६% हिस्सेदारी असून जानेवारी ते मार्च २०२३ ह्या आर्थिक तिमाहीत किर्लोस्कर कंपनीचे एकूण ८,३४,४५७ शेअर्समध्ये LIC ने हिस्सेदारी नोंदवली आहे.