Kisan Rail | शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहून नेण्यासाठी अनेक वेळा गाड्यांची गरज लागते. परंतु या गाड्या उपलब्ध नसल्याने अनेकवेळा शेतकरी त्यांचा शेतमाल हा रेल्वेने दुसरीकडे बाजारात नेतात. शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यासाठी किसान रेल सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून हे किसान रेल बंद आहेत. अशातच आता ही किसान पुन्हा एकदा सुरू करावी. अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना केलेली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा एकदा सुरू करावी अशी मागणी केलेली आहे. ही रेल्वे कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. आणि या रेल्वेला शेतकऱ्यांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. या रेल्वेचा वापर करून अनेक शेतकऱ्यांनी दिल्ली, कोलकत्ता मुजफरपूर आणि शालिमार यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक पिके नेली होती. त्यांनी डाळिंब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू यांसारखे भाज्या कमी वेळेत आणि कमी खर्चात वाहतूक केली होती. आणि त्यांना तिथे जाऊन चांगला नफा देखील मिळाला होता. किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी सुरू केल्यामुळे वाहतूकीचा खर्च जवळपास 75 टक्के कमी झाला होता. जर या वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 7 ते 8 रुपये खर्च येत असेल, तर रेल्वे सुरू झाल्यापासून हा वाहतूक खर्च केवळ 2.50 इतका झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे हा एक फायद्याचा पर्याय ठरला होता. परंतु ही किसान रेल्वे बंद झाल्याने शेतकऱ्यांसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे ही किसान रेल (Kisan Rail) लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. यामुळे वस्त्रोद्योगाला आणि कृषी उत्पादना देखील चालना मिळणार आहे तसेच सोलापूरमधील वस्त्रोद्योगाला टर्मिनल मुळे जागतिक बाजारपेठांमध्ये संधी मिळणार आहे. या बाजारपेठेमध्ये प्रभावी आणि जलद गतीने वाहतूक करता येईल आणि शेतकऱ्यांचा खर्च देखील कमी होईल.