किसन वीर-खंडाळ्या’चे ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Kisanveer Sugher Makarand Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
खंडाळा येथील किसन वीर- खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाच्या पहिल्या पंधरवड्याचे बील रक्कम ९ कोटी २४ लाख ७१ हजार ८५४ रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्याकडे सन २०२२-२३ मध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसास प्रतिटन २ हजार ५०० रूपये पहिला हप्ता चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी जाहीर केलेला होता. त्याप्रमाणे किसन वीर-खंडाळा साखर उद्योगाचा (दि.२६/१०/२२ ते १०/११/२२) पहिल्या पंधरवड्यामध्ये गळिताकरिता आलेल्या ३६ हजार ९८८ मेट्रिक टनाची होणारी रक्कम ९ कोटी २४ लाख ७१ हजार ८५४ रूपये संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्व झालेला सर्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.