‘या’ Multibagger Stock ने गेल्या 10 वर्षांत 5500 टक्क्यांहून जास्त रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जागतिक बाजारात मंदीचे वातावरण आहे. मात्र असे असूनही भारतीय शेअर बाजारात गेल्या काही वर्षांत अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यामध्ये SRF Ltd. या केमिकल कंपनीचे नाव देखील सामील आहे. गेल्या 10 वर्षांत SRF Ltd. ने गुंतवणूकदारांना 5560 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. मात्र, सध्या या कंपनीचे शेअर्स 2,864.35 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 19 टक्क्यांनी खाली आले आहेत.

This multi-bagger stock gave a whopping return of more than 8000% in just 5  months

आज, NSE वर SRF Ltd. चे शेअर्स थोड्या घसरणीसह.2322 रुपयांवर बंद झाले तर BSE वर त्याची किंमत 2324 रुपये होती. ब्रोकरेज हाऊसने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे SRF वर आपली तेजीची भूमिका कायम ठेवली आहे. हे जाणून घ्या कि, 14 सप्टेंबर रोजी या शेअर्सने गेल्या एका वर्षाचा उच्चांक गाठला होता. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

निर्मल बंग सिक्युरिटीजने आपल्या रिपोर्ट्स म्हटले की,”या केमिकल कंपनीची ऑर्डर बुक खूपच मजबूत आहे. तसेच यापुढेही वाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे.” ब्रोकरेज हाऊसने पुढे सांगितले की,“केमिकल्स व्यतिरिक्त, फ्लोरो पॉलिमर सेगमेंट कंपनीसाठी मध्यम कालावधीसाठी एक चांगली संधी म्हणून उदयास येऊ शकते. तसेच येत्या काही दिवसांत आम्ही मोठ्या कॅपेक्स योजना देखील जाहीर होण्याची अपेक्षा करतो. BOPET मधील दबावामुळे पॅकेजिंग फिल्म्स व्यवसायातील मार्जिन घसरत आहे.” Multibagger Stock

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely  - BusinessToday

त्याच वेळी, आणखी एका ब्रोकरेज हाऊस CITI ने 3,125 रुपयांच्या टार्गेट सहीत SRF च्या शेअर्ससाठी “BUY” कॉल दिला आहे. कंपनी आपला केमिकल व्यवसाय वाढवत आहे. मात्र, पॅकेजिंग फिल्मच्या एकूण कामगिरीवर दबाव राहण्याची शक्यता आहे. B&K सिक्युरिटीजने देखील केमिकल स्पेसमधील निवडक स्टॉक्सबाबत उत्साह दाखवत SRF च्या शेअर्ससाठी 2,844 च्या टार्गेट प्राईस सहीत ”BUY” रेटिंग दिले आहे. Multibagger Stock

गेल्या काही वर्षांत आयटी, केमिकल, ऑटो यासह अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. जो पारंपारिक बचत योजनांमध्ये मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.srf.com/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता