हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Vikas Patra : केंद्र सरकार देशातील गरिब जनतेच्या आर्थिक मदतीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. किसान विकास पत्र ही त्यापैकीच एक योजना आहे. यामध्ये गुंतवलेल्या पैशाला सरकारी गॅरेंटी देखील मिळते. या योजनेद्वारे काही वर्षांत पैसे दुप्पट होतात. कसे ते जाणून घ्या…
किसान विकास पत्रामध्ये (Kisan Vikas Patra) 6.9 टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत, गुंतवलेले पैसे फक्त 124 महिन्यांत दुप्पट होतील. जर कोणत्याही गुंतवणूकदाराने खरेदी केल्यानंतर एक वर्षाच्या आत पैसे काढून घेतले तर त्याला व्याजाचा लाभ मिळणार नाही. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
किसान विकास पत्राचा मॅच्युरिटी पिरियड 10 वर्षे आणि 4 महिने आहे. या काळात आपली गुंतवलेली मूळ रक्कम दुप्पट होते. म्हणजेच जर यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर ते 10 लाख होतील. यामध्ये लाभार्थ्यांना मुदतपूर्तीपूर्वी पैसेही काढता येतील, मात्र त्यासाठी काही अटी असतील. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) हे सर्टिफिकेटच्या स्वरूपात दिले जाते. जे 1000, 5000, 10000 आणि 50000 च्या स्वरूपात खरेदी करता येतील.
यामध्ये कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मॅच्युरिटीनंतर पैसे मिळू शकतात. मात्र हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे डिटेल्स द्यावे लागतील. जे दिल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. जर गुंतवणूकदाराला 50000 रुपये किंवा त्याहून जास्त पैशांची गुंतवणूक करायची असेल, तर त्याला आपले पॅन कार्ड डिटेल्स द्यावे लागतील. किसान विकास पत्र योजनेद्वारे कर्ज देखील मिळू शकते. याचा वापर गॅरेंटी म्हणूनही करता येतो. Kisan Vikas Patra
Kisan Vikas Patra अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/saving-schemes/kisan-vikas-patra.html
हे पण वाचा :
Post Office च्या किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो? समजून घ्या
Post Office Savings Schemes : व्याज मिळविण्यासाठी पोस्ट ऑफिस MIS खाते बचत खात्याशी करा लिंक
Kisan Vikas Partra : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत तुमचे पैसे करा दुप्पट