Kisan Vikas Patra Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 लाख गुंतवा अन् मिळवा 10 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Kisan Vikas Patra Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kisan Vikas Patra Scheme | आजकाल आपण पाहिले, तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. भविष्याचा विचार करता ही महागाई वाढतच जाणार आहे. त्यामुळे आजकाल सगळ्यांनाच गुंतवणुकीचे महत्त्व खूप चांगले कळलेले आहे. पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या पैशाची बचत करणे आणि ते भविष्यसाठी उपयोगाला येतील असे ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अनेक लोकांच्या कमाईतील काही ना काही हिस्सा गुंतवत असतात. आजकाल बाजारामध्ये गुंतवणुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहे. बँकांमध्ये त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये लोक गुंतवणूक करत असतात.

परंतु पोस्ट ऑफिस ही सरकारी योजना (Government scheme) तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. पोस्ट ऑफिस ही दीर्घ काळापासून एक विश्वासहार्य योजना आहे. ही एक सरकारी योजना असल्याने त्यातून परतावा देखील खूप चांगला मिळतो. त्यामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केट प्रमाणे पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर काही काळाने हे पैसे तुम्हाला दुप्पट होऊन मिळतील.

पोस्ट ऑफिस हे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक योजना देत असते. अशातच पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये दुप्पट नफा मिळतो. त्यामुळे अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करत असतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे महिन्यातच दुप्पट होतात. या योजनेमध्ये तुम्ही 100 रुपयांच्या पटीत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. कमाल गुंतवणूक करावयाला कोणत्याही मर्यादा नाही. अशा प्रकारे तुम्ही हवे तितके पैसे यामध्ये गुंतवू शकता.

या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्ही एक किंवा डबल खाते देखील उघडू शकता. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना हे खाते उघडता येते. म्हणजेच एखादी व्यक्ती या योजनेमध्ये किती खाते उघडू शकतात. याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तुम्ही जास्त खाते देखील उघडू शकता. या योजनेअंतर्गत तिमाही आधारावर ठरलेली असते. या योजनेत तुम्हाला सध्या 7.5 टक्के दराने व्याजदर दिले जाते.

जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर म्हणजेच 115 महिन्यानंतर त्या व्यक्तीला 7.5 टक्के दराने व्याज मिळते. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या मुदतीनंतर 10 लाख रुपये मिळतात. म्हणजे जर तुम्ही 5 लाख गुंतवले तर तुम्हाला त्याचा दुप्पट फायदा मिळतो. म्हणून अशी योजना अत्यंत फायद्याची अशी योजना आहे. तुम्हाला जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही या योजनेत नक्कीच गुंतवणूक करू शकता.