Kitchen Tips| अनेकजण घरी डोसा मनासारखा म्हणत नाही म्हणून तो खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातात आणि सांबर, चटणीसोबत त्याचा आस्वाद घेतात. परंतु घरी डोसा बनवून खाण्याची मज्जाच वेगळी असते. हॉटेलमध्ये मिळणारा कुरकुरीत डोसा आपल्याला देखील घरी बनवता येऊ शकतो. त्यासाठी फक्त पुढील टीप्स फॉलो करण्याची गरज आहे. यामुळे तुमचा डोसा कधीही तव्याला चिकटणार नाही तसेच तो जाळीदार आणि मऊ बनेल.
1) डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवू नका – बरेचजण डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजवण्यास घालतात. यामुळे ते व्यवस्थित भिजल्या जात नाहीत. इथून पुढे कधीही डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजायला घाला. यानंतर ते आंबायला ठेवा.
2) डाळ आणि तांदळाचे प्रमाण व्यवस्थित घ्या – डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचे व्यवस्थित प्रमाण घेणे आवश्यक असते. तुम्हाला जर परिपूर्ण डोसा बनवायचा असेल तर तीन भाग तांदूळ घेतल्यास एक वाटी उडीद डाळ घ्या. या प्रमाणामध्ये तुम्ही कुटुंबाच्या संख्येनुसार वाढ करू शकता. (Kitchen Tips)
3) फर्मेंटेशनसाठी मोठे भांडे वापरा – उन्हाळ्यामध्ये डोशाचे पीठ आंबवण्यासाठी 7 ते 8 लागतात. तरी हिवाळ्यात दहा ते पंधरा तास लागतात. हे पीठ व्यवस्थित आंबवले जावे यासाठी एक मोठे भांडे वापरा. लहान भांडे वापरल्यामुळे ते पीठ फुगणार नाही.
4) बॅटरची कंसिस्टंसी पहा – डोसा बनवण्यापूर्वी डोशाची कंसिस्टंसी पहा. लक्षात ठेवा की, डोसा बनवण्यासाठी पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होऊ नये. डोशाचे पीठ सामान्य तापमान असलेल्या रूममध्ये ठेवावे.
5) पीठ फ्रिजमध्ये ठेवू नये – एखाद्या पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीजमध्ये ठेवून देतो. अनेकवेळा आपण शिल्लक राहिलेले पीठ देखील फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करतो. परंतु असे केल्यामुळे डोसा व्यवस्थित बनणार नाही. जर तुम्ही फ्रीजमध्ये हे पीठ ठेवलेच तर बनवण्यापूर्वी ते एक, दोन तास वरती काढून ठेवा.(Kitchen Tips)