Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. पण लसूण सोलने म्हणजे वेळखाऊ आणि काटकटीचे काम. म्हणूनच आम्ही लसूण सोलण्यासाठीचे काही जबरदस्त फंडे सांगणार आहोत ज्याने लसणाचा 1 गड्डा काय किलोभर (Kitchen Tips) लसूण तुम्ही सहज सोलू शकाल. चला तर मग जाणून घेऊया…
लाटणे
झटपट लसूण सोलण्यासाठी लाटणे कामी येईल. ही पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला लाटणे घेऊन त्याखाली लसूणच्या पाकळ्या टाकून दोन तीन वेळा लटल्यासारखे फिरवायचे आहे. त्यामुळे लसनाची साल लवकर वेगळी होईल
गरम पाणी (Kitchen Tips)
तुम्हाला जास्त प्रमाणात लसूण सोलून हवा असेल तर ही ट्रिक चांगली आहे. यासाठी एका बाउल मध्ये पाणी घ्या त्यामध्ये लासनाच्या पाकळ्या टाका आणी ओवन ला थोडे गरम करून घ्या. त्यानंतर अगदी (Kitchen Tips) सहजपणे लासनाची साल निघेल.
चाकुचा वापर
झटपट लसूण सोलण्यासाठी चाकूचा वापर करता येईल. चाकूच्या साहाय्याने (Kitchen Tips) लासनाच्या गडड्याला जिथे पाकळ्या जोडलेल्या असतात तो भाग कापून टाका. म्हणजे पाकळ्या सहज मोकळ्या होतील आणि सहजपणे लसूण सोलता येईल.