Kitchen Tips : स्वयंपाकातल्या काही गोष्टी ह्या प्रत्येकाला जमतातच असे नाही. त्यातही पूरण पोळी, पुरी हे कटकटीचे प्रकार वाटतात. कारण खरंच या गोष्टी मॅगी कारण्याइतक्या सोप्या नाहीत. शिवाय या गोष्टी करण्यामध्ये वेळ ही खूप खर्च होतो. म्हणूनच आजकालच्या महिला काही ट्रिक्स वापरताना दिसतात. मग चपाती गोल येत नसेल तर त्याला प्लेटने आकार दिला जातो. सोशल मीडियावर सध्या सध्या असाच एक व्हिडीओ (Kitchen Tips) व्हायरल होतो आहे ज्यामुळे पुरी बनवण्याचे वेळखाऊ काम चुटकीसरशी होऊन जाईल. ते देखील पोळपाट लाटणे न वापरता.
पोळपाट लाटणे न वापरता बनवा पुरी
खरेतर पुरी बनवण्यासाठी पोळपाट लाटणे लागते. पण पुरी (Kitchen Tips) बनवण्यासाठी या महिले या दोन्ही वस्तूंचा वापर केला नाही. या महिलेने एक मोठा प्लास्टिक कागद घेतला आहे. त्याला तेल लावले त्याच्या मध्ये एकावेळी चार पुरीचे गोळे घेतले आहेत. त्यानंतर त्यावर कागद झाकून एका गोलाकार प्लेटच्या साहाय्याने या गोळ्यांवर दाब दिला आहे. त्यामुळे पटकन ह्या गोळ्यांच्य पुऱ्या (Kitchen Tips) बनल्या आहेत. शिवाय या पुऱ्या तेलात टम्म फुगलेल्या सुद्धा दिसत आहेत.
हा व्हिडीओ ITZ ruchi १२३ या इन्स्टा अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून याला चांगले व्ह्यूज (Kitchen Tips) मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर काहींनी ही ट्रिक नक्की आजमावून पाहणार असल्याचे म्हंटले आहे.