Kitchen Tips : उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे अन्नपदार्थ आणि दुधाचे लवकरच खराब होण्याचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे अन्न सुरक्षित ठेवणे आणि त्याची गुणवत्ता टिकवणे हे मोठे आव्हान (Kitchen Tips) ठरते. योग्य काळजी घेतल्यास अन्न खराब होण्यापासून वाचवता येऊ शकते आणि आरोग्यासाठीही सुरक्षित राहू शकते.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे दूध पटकन आंबट होते. जर आपण काही साधे उपाय केले तर उन्हाळयात दूध नसण्यापासून वाचवू शकतो.याकरिता
दूध नेहमी फ्रीजमध्ये 4°C च्या खाली ठेवा. शक्यतो उकळूनच साठवा आणि गरजेनुसारच बाहेर काढा. उकळलेले दूध लगेच गार करून फ्रीजमध्ये ठेवा.
प्लास्टिकपेक्षा स्टील किंवा काचेच्या भांड्यात दूध साठवा. उष्णतेच्या संपर्कात येणारी भांडी टाळा.
बाहेरून आणलेल्या दुधाची योग्य हाताळणी (Kitchen Tips)
पिशवीतील दूध उघडल्यानंतर लगेच उकळा.
शक्यतो गाईचे ताजे दूध वापरण्याला प्राधान्य द्या.
अन्नपदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स (Kitchen Tips)
दही, ताक, लोणी यासारखे पदार्थ ताजे ठेवण्यासाठी ते नेहमी थंड ठिकाणी ठेवा. उष्णतेमुळे आंबट होण्याची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे. पानेदार भाज्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. फळे थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. उन्हाळ्यात उष्णतेमुळे स्ट्रीट फूड किंवा उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
उष्णतेमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गाला टाळा (Kitchen Tips)
- अन्न बनवताना हात स्वच्छ धुवा आणि स्वच्छ भांडी वापरा.
- साठवलेले अन्न पुन्हा गरम करूनच खा.
- उन्हाळ्यात (Kitchen Tips) योग्य अन्न साठवणूक आणि स्वच्छतेच्या सवयी अवलंबून तुम्ही तुमच्या आहाराला सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे आरोग्यही चांगले राहील आणि अन्न खराब होण्याचे प्रमाणही कमी होईल.