हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Tips) मार्केटमध्ये भाज्यांचा ढीग कोसळलात तरी चांगल्या भाज्या मिळणं जरा अवघडचं. कारण भाज्या पिकवताना वापरली जाणारी खत, औषधांची फवारणी यामुळे भाज्यांमधील महत्वाचे आणि आरोग्याला आवश्यक असणारे घटक आधीच लोप पावलेले असतात. परिणामी आपल्यापर्यंत भाज्या येतात तेव्हा आधीच त्यामधून सत्व कमी झालेले असते. अनेकदा भाज्या पिकवताना वापरली जाणारी औषधे ही भाज्यांमध्ये अळी किंवा किडे होण्याचे मुख्य कारण ठरते. यांपैकी एक भाजी म्हणजे फ्लॉवर अर्थात फुलकोबी.
फ्लॉवरची भाजी वर वर दिसायला अगदी चांगली असते. (Kitchen Tips) पण फ्लॉवर निवडताना समजत की त्याच्या आत लहान मोठ्या अळ्या झाल्या आहेत. ज्या एकाच वेळी पूर्ण काढणे कठीण असते. त्यामुळे बाजारातून आणलेल्या फ्लॉवरची भाजी करण्याआधी तो गरम पाण्यात उकळवला जातो. ज्यामुळे त्यातील किडे किंवा अळ्या बाहेर पडतील. पण आज आम्ही गृहिणींना आणखी एक सोपी ट्रिक सांगणार आहोत. जिच्या माध्यमातून तुम्ही फ्लॉवरमधील छुप्या अळ्या देखील सहज काढू शकाल.
‘अशी’ सेकंदात बाहेर पडेल फ्लॉवरमधील अळी (Kitchen Tips)
बाजारातून आणलेला फ्लॉवर स्वच्छ करून फ्रिजमध्ये साठवायचा असेल त्याआधी ही ट्रिक नक्की वापरा. ज्यामुळे इतर भाज्या खराब होणार नाहीत. यासाठी काय कराल? तर सर्वात आधी फ्लॉवरची वरील पाने काढून टाका. त्यानंतर त्याचा हिरवा देठ तसाच राहू द्या आणि पुढील काही सेंकद फ्लॉवरला गॅसवर ठेवून द्या. ज्यामुळे तो गरम होईल आणि उष्णतेमुळे त्याच्या आत दडलेले किडे वा अळी एक एक करून बाहेर पडू लागतील. अगदी काही सेकंदातच फ्लॉवरमधील सर्व अळ्या बाहेर पडतील. त्यानंतर फ्लॉवर स्वच्छ करून तुम्ही फ्रिजमध्ये साठवू शकता.
(Kitchen Tips) सोशल मीडिया युट्युबवर Maa, yeh kaise karun? नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून शेअर करण्यात आलेली ही ट्रिक गृहिणी वर्गासाठी अत्यंत कामाची आणि मुख्य म्हणजे फार सोपी आहे. या ट्रिकमुळे फ्लॉवरची भाजी साफ करण्याची झंझट मिटेल आणि फ्लॉवर साठवताना इतर भाज्या खराब होण्याची भीती देखील वाटणार नाही. त्यामुळे बाजारातून फ्लॉवरची भाजी खरेदी केलात तर ही ट्रिक जरूर वापरा.