मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. पॅट कमिन्सची (Pat Cummins) दुखापत फारशी गंभीर नाही आहे दोन आठवड्यांत तो पूर्ण तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
KKRला पॅट कमिन्सची उणीव जाणवेल
पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल मधून बाहेर पडल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. कोलकाता सध्या 12 सामन्यांमध्ये पाच विजयांसह सातव्या स्थानावर आहे. कोलकाताला या सीझनमध्ये प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. मात्र अटीतटीच्या लढती अगोदर पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे कोलकाताला त्याची उणीव भरून काढावी लागणार आहे.
त्यामुळे आता कोलकाताला शिवम मावी, उमेश यादव आणि टीम साऊथी यांच्यावर अवलंबून असावे लागणार आहे. त्यामुळे आता कोलकत्ता पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) जागी कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पॅट कमिन्स हा वेगवान गोलंदाजाबरोबर एक फलंदाजदेखील आहे.