व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनाही धमकी देण्यात आली आहे. पवार यांना धमकीचे ट्विट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे.

मुंबईत शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनंतर पवार याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या सुरक्षेची काळजीही पोलिसांकडून घेतली जात असताना आता पवार यांना ट्विटरद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची धमकी पवारांना देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विट द्वारे पवारांना धमकी देण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. “काय पातळी वर हे सगळे होते आहे. ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे आव्हाड यांनी केली आहे.

नेमके काय केले आहे ट्विट?

शरद पवार यांना पाठवण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहण्यात आलेले आहे कि, आता वेळ आली आहे. बारामतीच्या ‘गांधी’ साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… अशा प्रकारचे ट्विट मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे.