Monday, January 30, 2023

आणखी एक मॅच विश्रांती घेतलीस तरी चालेल; कोलकात्याचा रोहित शर्माला अजब सल्ला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मागच्या सामन्यात दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आज रोहित शर्मा मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचे आहे. याचदरम्यान कोलकाताने ट्विट करत रोहितला न खेळण्याचा अजब सल्ला दिला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला एक गमतीशीर सल्ला दिलाआहे. रोहित शर्मा आणखी एक मॅच विश्रांती घेतलीस तर तुझं काही नुकसान होणार नाही. टी20 वर्ल्ड कप जवळ येत आहे.’ असं सूचक ट्विट करून केकेआरने रोहितला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

https://twitter.com/KKRidors/status/1440910963398430724?s=20

दरम्यान, मुंबई आणि कोलकाता संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २२ सामन्यात मुंबईने, तर ६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. २०२० मध्ये आबुधाबीत झालेल्या स्पर्धेत एकूण ३ सामने पार पडले होते. त्यापैकी २ सामन्यात मुंबईत, तर एका सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.