हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला असून देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य या मॅचकडे आहे. चेन्नईतील एकूण वातावरण पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. त्यामुळे जर आजच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर? कोणत्या संघाला विजयी घोषित करणार? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल… चला तर जाणून घेऊया BCCI चा प्लॅन बी ….
पाऊस पडला तर काय होईल ? KKR vs SRH Final
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील अंतिम सामन्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे एक रिझर्व डे ठेवण्यात आला आहे.
जर पावसामुळे सामना 26 मे रोजी पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 27 मे रोजी सामना पूर्ण करण्यात येणार आहे.
जर पावसाने आयपीएलच्या अंतिम दिवशी व्यत्यय आणला तर सामन्याचा निकाल देखील डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने ठरवला जाऊ शकतो.
KKR विरुद्ध SRH फायनल मॅचच्या रिझर्व डेला सुद्धा पाऊस पडला, तर अंपायर नियमित वेळेत कमीत कमी 5-5 ओव्हर्सचा सामना आयोजित करण्याचा विचार करतील.
पावसामुळे राखीव दिवशीही अंतिम सामना खेळला गेला नाही, तर पॉइंट टेबलच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला विजेता घोषित केले जाऊ शकते. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पहिल्या स्थानावर आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यातील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचे मानले जात आहे. हैद्राबादकडे शहाबाज अहमद आणि अभिषेक शर्मा असे २ फिरकीपटू आहेत ज्यांनी क्वालिफायर सामन्यात राजस्थान फलंदाजांना रोखलं होते. तर कोलकात्याकडे वरून चक्रवर्ती आणि सुनील नारायण अशी २ मुख्य अस्त्रे आहेत त्यामुळे फिरकीपटूंच्या कामगिरीवर दोन्ही संघाचा विजय अवलंबून असेल. स्पर्धेचा अंतिम टप्पा (KKR vs SRH Final) असल्याने मैदान थोडं संथ झालं असेल. मात्र टिकून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारणे सोप्प होईल.