हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यामुळे अनेकांना डायबिटीस सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहे. अगदी कमी वयात देखील लोकांना डायबिटीस होत आहे. यावेळी आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी चेक करतो. तेव्हा उपाशीपोटी त्यानंतर जेवल्यानंतर दोन वेळा रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यानंतर ते चेक करून त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि आपली शुगर किती आहे हे तपासले जातात.
परंतु रक्त घेताना सुईत टाकल्यावर अनेकांना खूप जास्त त्रास होतो. रक्त ओढून घेताना देखील त्रास होतो. परंतु आता हा त्रास होणार नाही. कारण आता संशोधनानुसार इथून पुढे रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्त घेण्याची गरज लागणार नाही. केवळ तुमचे डोळे पाहूनच तुमच्या रक्तातील साखर किती आहे, हे समजणार आहे. यासाठी एक नवीन उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे रक्त न घेता तुमच्या साखरेचा स्तर तपासला जाणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून हे डिवाइस तयार करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. ही या उपकरणाच्या माध्यमातून एक हजार रुग्णांची तपासणी देखील करण्यात आलेली आहे. त्यांपैकी 90 ते 95 टक्के रुग्णांचे अहवाल बरोबर आलेले आहे. यामध्ये सगळ्यात आधी रुग्णांच्या डोळ्यांची बुबुळ आणि पापण्याचे फोटो घेतले जातात आणि डिवाइसच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. अगदी कमी काळामध्ये ही तपासणी पूर्ण होते. दहा ते पंधरा मिनिट अहवाल येतो. मग परंतु दोन वेळा चाचणीसाठी दोन फेऱ्या माराव्या लागतात. परंतु या डिवाइसच्या माध्यमातून आपल्याला एका मिनिटातच रिपोर्ट मिळतो. सध्या डिवाइसवर जास्त संशोधन चालू आहे.