आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार क्रेडिट स्कोअर रिपोर्ट; ‘हि’ आहे प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला अनेकदा मुलांचं शिक्षण, घरखरेदी, आपत्कालीन घटना, परदेशवारी आदी गोष्टींकरिता आर्थिक गरज भासते. तेव्हा आपण बँकेकडून किंवा दुसऱ्या कुठून कर्ज उचलत असतो. तेव्हा आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) उत्तम असेल त्यांना कोणतीही बॅंक किंवा वित्तीय संस्था कर्ज लगेच मंजूर करते. तसंच, क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल तर बॅंकेशी व्याजदर किंवा अन्य काही शुल्कांसंदर्भात वाटाघाटीदेखील करता येते. त्यामुळे आता कर्जासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा क्रेडिट स्कोअर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळवता येणार आहे.

जगाच्या तुलनेत भारतात व्हॉट्सअ‍ॅप युझर्सची संख्या सर्वाधिक म्हणजेच 48.75 कोटी आहे. व्हॉट्सअ‍ॅप हा आता भारतीयांच्या रोज जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि क्रेडिट स्कोअर (Credit Score) सुविधा देणाऱ्या एक्स्पिरियन इंडिया या कंपनीने नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रेडिट स्कोअर प्रदान करण्याची सेवा सुरू करण्याबाबत घोषणा केली आहे. अशा प्रकारची ही देशातली पहिली सुविधा असेल. या सुविधेच्या माध्यमातून क्रेडिट स्कोअर अगदी सहजपणे पाहता येणार आहे. तसंच क्रेडिट पोर्टफोलिओवर लक्षदेखील ठेवता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर क्रेडिट स्कोअर जाणून घेण्याची प्रक्रिया
व्हॉट्सअ‍ॅपवर क्रेडिट स्कोअर (Credit Score) जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम एक्स्पिरियन इंडियाच्या +91-9920035444 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर Hey असा मेसेज पाठवावा लागेल किंवा बारकोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर अशी प्राथमिक माहिती शेअर करावी लागेल. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुमचा एक्स्पिरियन क्रेडिट स्कोअर मिळेल. एक्सपिरियन क्रेडिट रिपोर्टची पासवर्ड सुरक्षित कॉपी मिळण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. ही कॉपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय