हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने रेशन कार्डचा नियमांमध्ये अनेक मोठे बदल केलेले आहेत. आज आम्ही रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वी सरकारने रेशन कार्डधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते आता ज्यांनी ई केवायसी केले नाही, त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. जर तुम्ही सरकारच्या नियमांचे पालन केले नाही, तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही. तसेच ही रेशन कार्डची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात.
ज्या लोकांचे रेशन कार्ड नवीन तयार करायचे आहे किंवा त्यात अपडेट करायचे आहे. याबाबतची लिस्ट सरकारने जारी केलेली आहे. आता याच लोकांना मोफत रेशन मिळणार आहे. ज्या लोकांनी या अटीची पूर्तता केली नाही. त्यांना मोफत रेशन मिळणार नाही. आता ऑनलाइन लिस्ट कशी चेक करायची? याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
भारत सरकारने आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टलवर रेशन कार्ड ग्रामीण यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही यादी ऑनलाईन पद्धतीने सहजपणे चेक करू शकता. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल, तरच तुम्हाला इथून पुढे रेशनचा लाभ मिळणार आहे. जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला रेशनचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला नवीन शिलापत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही सदस्य हा सरकारी पद किंवा राजकीय पद धारण केलेला नसावा. तसेच रेशन कार्डचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
रेशन कार्ड यादी कशी चेक करावी?
- तुम्हाला जर रेशन कार्ड ग्रामीण यादी चेक करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला राष्ट्रीय अन्नसुरक्षा या पोर्टलवर जावे लागेल.
- त्यानंतर मुख्य पेजवर दिलेले रेशन तपशील तपासा आणि राज्य पोर्टलवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तहसील, गाव ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टी निवडा.
- त्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्डची ग्रामीण यादी उघडेल.
- या यादीत तुम्ही तुमचे नाव तपासावे.
- यादीत तुमचे नाव असेल , तर तुम्ही ती यादी डाऊनलोड देखील करू शकता.