सरकारची नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे आणि त्याचा तुमच्या वाहनावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरकारने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत, पीएम मोदींनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी देखील सुरू केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही पॉलिसी देशातील अयोग्य वाहने वैज्ञानिक पद्धतीने काढण्यात मोठी भूमिका बजावेल. सरकारची ही स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे आणि त्याचा तुमच्या वाहनावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.

सरकारची स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे ते जाणून घ्या
या नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी नुसार, 15 आणि 20 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप केली जातील. कमर्शिअल वाहन 15 वर्षांनंतर जंक घोषित केले जाऊ शकते तर खाजगी वाहन 20 वर्षांनंतर जंक घोषित केले जाऊ शकते. या पॉलिसी अंतर्गत, केवळ वाहनाचे वय बघून स्क्रॅप केले जाणार नाही, तर वाहने शास्त्रीय पद्धतीने स्क्रॅप केले जातील आणि यासाठी अधिकृत वाहन सुविधा केंद्रे उभारली जातील जी तंत्रज्ञानाशी जोडलेली असतील.

नवीन नियम कधी अमलात येतील?
फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅपिंग सेंटरशी संबंधित हे नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होतील. सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांची 15 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. व्यावसायिक वाहनांसाठी आवश्यक फिटनेस टेस्टशी संबंधित नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. या व्यतिरिक्त, सामान्य वाहनांसाठी हे नियम टप्प्याटप्प्याने 1 जून 2024 पासून लागू केले जातील.

नवीन गाडीच्या खरेदीवर रजिस्ट्रेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत
जुनी कार स्क्रॅप केल्यावर एक सर्टिफिकेट दिले जाईल. वाहन उत्पादकांना स्क्रॅपिंग सर्टिफिकेटच्या दाखवल्यावर नवीन वाहन खरेदीवर 5 टक्के सूट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या व्यक्तीकडे हे सर्टिफिकेट असेल त्याला नवीन वाहन खरेदीवर रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ते म्हणाले की,” स्क्रॅपिंग पॉलिसीमधून रॉड टॅक्समधूनही काही प्रमाणात सूट दिली जाईल.”

या पॉलिसीचे हे फायदे असतील
सामान्य कुटुंबांना या पॉलिसीचा हरप्रकारे मोठा फायदा होईल. रस्ते अपघातासारख्या धोक्यांपासून मुक्तता मिळेल हा पहिला फायदा होईल. जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यातून सुटका होईल. यासह, या पॉलिसीमुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि देखभाल खर्च, दुरुस्ती खर्च, जुन्या वाहनाची इंधन कार्यक्षमता देखील वाचवेल.”