हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाने यंदा मतदारांसाठी एक खास अँप लाँच केलं आहे. ‘Know Your Candidate’ असे या अँपचे नाव असून या अँपच्या माध्यमातून तुमच्या भागातील उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्हाला एका क्लिकवर समजणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल की, ‘Know Your Candidate या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराची माहिती त्यांच्या मोबाईलवरून कळू शकेल. यासाठी तुम्हाला अँड्रॉईड आणि आयफोनच्या ॲप स्टोअरमध्ये जाऊन ‘नो युवर कॅन्डिडेट’ ॲप डाउनलोड करावे लागेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील जगजाहीर करावा लागेल. त्यांना तीन वेळा वृत्तपत्रात सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करणे आवश्यक असेल. जेणेकरून मतदारांना त्यांच्या उमेदवारावर काय खटले आहेत हे कळेल असं राजीव कुमार यांनी सांगितलं. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही? त्याच्यावर कोणता खटला आहे का? किंवा त्याची मालमत्ता आणि दायित्वे काय आहेत, ही सर्व माहिती केवायसी ॲपद्वारे मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
कसे चेक कराल –
सर्वात आधी Know Your Candidate (KYC) ॲप Google Play Store वरून डाउनलोड करा.
येथे तुम्ही उमेदवाराचे नाव टाकून त्याला सर्च करू शकता.
या अँप मधून उमेदवाराचा गुन्हेगारी पार्श्वभूमी समजले.
उमेदवारावर कोणतीही केस फाइल असल्यास, त्याची स्थिती देखील दर्शविली जाईल.
उमेदवारावर कोणकोणते आरोप आहेत याबाबतचे डिटेल्स सुद्धा मतदारांना दिसतील.