आता थाळी वाजवायची नाही, थाळीत जेवायचं.., तेही मोफत !! जाणून घ्या महाराष्ट्रातील 893 शिवभोजन केंद्रांची माहिती फक्त एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कडक निर्बंध लादत राज्यात संचारबंदी केली आहे. परंतु ही घोषणा करतानाच त्यांनी हातावरील पोट असणाऱ्यांना 5476 कोटींचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले. तसेच मोफत शिवभोजन थाळीची देखील घोषणा केली आहे.

शिवभोजन थाळीची सुरुवात झाल्यानंतर ही थाळी 10 रुपयांत सर्वसामान्यांना उपलब्ध होत होती. मागील लॉकडाऊन काळात 5 रुपयांच्या माफक दरात लोकांनी याचा लाभ घेतला. यंदा मात्र लोकांची परिस्थिती विचारात घेऊन राज्य सरकारने ही सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाकाळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिलाय. आता संचारबंदीच्या अर्थात अघोषित लॅाकडाऊनच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळी मोफत आहे. पण ते नक्की कुठे मिळेल याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या

http://mahaepos.gov.in/Eatery_plate_limit_abstarct.jsp

http://mahaepos.gov.in/Eatery_plate_limit_abstarct.jsp

दरम्यान राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आजपासून राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment