कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने साडे तीन शक्ती पीठांपैकी महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर प्रवेशद्वार मध्यरात्री पासून बंद करण्यात आलय. अंबाबाईची आरती झाल्यानंतर मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
आज सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. मोजके पुजारी आणि सुरक्षारक्षकांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात असून बंद असणाऱ्या प्रवेशद्वारा बाहेरूनच भाविकांना दर्शन घ्यावे लागत आहे. यासोबतच दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंह वाडी दत्त मंदिर प्रसिद्ध बाळुमामा मंदिरासह जिल्ह्यातील सर्वच मंदिरात अनिश्चित काळासाठी दर्शन बंद करण्यात आल आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.