हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान्याच्या कबरीजवळचे अतिक्रम प्रशासनाने हटवले. त्यानंतर आटणारा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाळत कारवाई केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
विशाळगडावर अनेक वर्षापासून अतिक्रमणे झाली असल्याने यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यानंतर वनविभागाचे पथक आज सकाळी आठच्या सुमारास वन विभागाचे पथक पायथ्याशी पोहोचले. तेथे वन विभागाच्या हद्दीत असणारे गडबुरुजाजवळील दस्तगीर इस्माईल मुजावर यांचे शेड व पायथ्याजवळचे धोंडू धुमक यांचे शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली.
विशाळगडाच्या पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या सुमारे एकरभर जागेत पक्की विटांची 20हून अधिक अतिक्रमणे आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः पंधरा दिवसांत काढून घ्यावीत, असा इशारा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी यावेळी दिला.
अतिक्रमणाबाबत मंत्रालयात सोमवारी बैठक
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. यात विशाळगड ग्रामस्थांनीही अतिक्रमण केल्याबाबतची कबुली देत अतिक्रमण काढण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी मंत्रालयात अतिक्रमण काढण्यासंदर्भाची चर्चा केली जाणार आहे.