कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्लॅस्टिक मुक्त प्रथम बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड आज करण्यात आली. याबाबतचे प्रशस्ती पत्र आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महाराष्ट्र सर्लकलचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ यांना प्रशस्थिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. बदलत्या काळानुसार पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पाऊन उचलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता हिच सेवा हे ध्येय ठेऊन स्टेट बँकेच्यावतीन पाच हजार कापडी पिशव्याचे वितरण करण्यात आले.
कृष्णा सांस्कृतिक भवन, उद्यमनगर येथे भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टॅण्ड अप इंडिया अतंर्गत महिला व मागासवर्गींयांना व्यवसाय उभारणीसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणेचा सोहळा यावेळी संपन्न झाला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप प्रबंधक अबिदूर रहमान, स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयचे प्रमुख प्रदीप देव व महिला मोठया संखेने उपस्थित होत्या.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.