Kolhapur Loksabha Election Result 2024| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने श्रीमंत छत्रपती शाहू उमेदवार म्हणून उभे राहिल्यापासून देशाचे लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. अशातच आज लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना शाहू महाराजांची लीड 54 हजारांवर पोहचली आहे. शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत मान आणि मत गादीलाच दिले असल्याचे आता स्पष्ट होत आहे. यात शाहू महाराज यांचा विजयाकडील कल पाहून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यात बंटी पाटलांनी आघाडी घेतली होती. तस पाहिले तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची होती.. त्यामुळे शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशालीवर महाविकास आघाडीकडून लढावं अशी ठाकरेंची इच्छा होती. परंतु बंटी पाटलांच्या विश्वासावर शाहू महाराजांनी मशालीवर न लढता काँग्रेसच्या हातावर लढणं पसंत केलं. परिणामी ठाकरेंनी शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली. आता जबाबदरी होती ती बंटी पाटलांची. इतक सगळं केल्यानंतर आता शाहूंच्या विजयासाठी बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी सूत्रे हातात घेतली आणि संपूर्ण कोल्हापूर पिंजून काढला.
निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात आधीपासूनच होती. त्यामुळे निकालानंतरच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शाहू महाराजांच्या विजयाचा दावा आधीपासूनच करण्यात आला होता. आता सतेज पाटलांचा कोल्हापुरातील करिश्मा, अगदी बूथ मॅनेजमेंट पासून केलेलं नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जीवावर शाहू महाराजांचा विजय नक्की झाला असल्याचे पाहिला मिळत आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचा मताधिक्य जास्त असलेल्या करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात जास्तीच झालेल्या मतदानामुळे शाहू महाराजांचा विजय सोप्पा झाला आहे.
…. म्हणून शाहू महाराज विजयाच्या जवळ (Kolhapur Loksabha Election Result 2024)
सतेज पाटील यांच्यासोबत ऋतुराज पाटील, जयश्री पाटील आणि पी एन पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. त्याउलट महायुतीमध्ये एकदिलाने काम झालं नाही असं बोललं जात आहे. त्यातच संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर दत्तक पुत्राचा आरोप केल्यानंतर तर जनतेमध्ये शाहू महाराजांबद्दलची सहानभूती आणखी वाढली होती आणि त्याचा फायदा शाहू महाराजांना झाला. शाहू महाराजांची इमेज सुद्धा त्यांच्या विजयासाठी महत्वाची मानली जात आहे. भाजप आणि मोदी सरकार विरोधात असलेल वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीचे आधीपासून असलेले वलय शाहू महाराजांच्या पथ्यावर पडलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेने सुद्धा वार फिरलं असल्याचं चित्र आज दिसत आहे. याचाच परिणाम पाहता आज शाहू महाराज विजयापर्यंत पोहोचले आहेत.