कोल्हापूर । तरुणांनी भररस्त्यात विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्याने तन नाशक प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे इथे हा संतापजनक प्रकार घडला. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपींच्या घरात घुसून तोडफोड केली. (Kolhapur Molestation Girl Suicide).
याप्रकरणी अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्याविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित अजित पाटील यानेही कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे नणुन्द्रे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
आहे काय नेमकं प्रकरण काय?
संशयित अजित प्रदीप आणि अक्षय यांनी 23 ऑक्टोबरला कोलोली ते तेलवे रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला अडवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने त्याच दिवशी सायंकाळी विषारी औषध प्राशन केलं. तिच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in