राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सतेज औंधकर
राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. या टोळीने राजस्थान पोलीस मागावर असल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास जोधपूरमध्ये हैदोस घालू असा धमकीवजा इशारा या गुंडांनी फोनद्वारे दिला होता.

राजस्थानमध्ये २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या टोळीच्या कोल्हापूर पोलिसांनी मात्र मुसक्या अवळल्या. मंगळवारी रात्री किणी टोल नाक्याजवळ पोलीस आणि गुंडांमध्ये धुमश्चक्री उडाली. दरम्यान, झालेल्या गोळीबारात दोन गुंडांवर पोलिसांनी गोळीबार करत त्यांना ताब्यात घेतले. ३० मिनिट चाललेल्या चकीमाकीनंतर पोलिसानी जीवावर उदार होत ही कामगिरी केली असून यासाठी सर्वत्र कोल्हापूर पोलीसांचे कौतुक होत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

दलितांच्या हत्या हे पण गुजरात माॅडेलच – नागनाथ कोतापल्ले

सुपरओव्हरमध्ये रोहित शर्माची कमाल ! तिसऱ्या T २० सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली

सांगलीच्या जिल्हा कारागृहात कैद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न