धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे समाजसुधारक महात्मा फुले – प्राचार्य टी.एस.पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभागामार्फत सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील व्याख्यानमाले मध्ये ”सत्यशोधक समाज आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर बोलताना प्राचार्य टी.एस.पाटील यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे महात्मा फुले हे या देशातील पहिले समाजसुधारक होते असे मत व्यक्त केले.

प्राचार्य पाटील यांनीं भारतीय समाजातील दैववाद, सनातन, ब्राम्हण्य वादाची परंपरा ही कशी अन्यायकारक आहे. या परंपरेने भारतीय समाजाचे प्रचंड नुकसान झाले. या सनातनी परंपरेच्या विरोधात महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन पुरोगामी विवेकवादी विचारांची पेरणी केली. त्यांनी या देशातील स्त्री, दलित आणि शेतकरी समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न केलेत. आजसुध्दा या देशाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी महात्मा फुलेंच्या विचारांची गरज आहे असंही प्राचार्य टी.एस.पाटील यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. जगन कराडे होते. यांनी महात्मा फुले यांच्या विचाराचे महत्व वर्तमनकालीन संदर्भामध्ये आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद माने यांनी केले तर श्री. अभिजीत पाटील यांनी आभार मानलेत. या कार्यक्रमास कॉमर्स विभागाचे प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अविनाश भाले आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment