कोल्हापूर जिल्ह्यात ‘आघाडी’ची जोरदार मुसंडी; ‘युती’च्या दिग्गजांना मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळ पासून सुरुवात झाली आहे. या मतमोजणीनंतर २८८ जागांचे कल हळूहळू समोर येत आहेत. ‘युती’ ने मतमोजणीमध्ये जोरदार मुसंडी मारली असली तरी ‘आघाडी’ सुद्धा सर्वांना काटे कि टक्कर देताना दिसत आहे. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचे सुद्धा निकाल समोर आले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके आघडीवर दिसत आहेत. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार पी एन पाटील पिछाडीवर पडलेले आहेत. काँग्रेस साठी महत्वाचा असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी जोरदार आघाडी घेतलेली दिसत आहे. टायच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे अमल महाडिक पिछाडीवर पडलेले आहेत.

राज्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आघाडीवर दिसत आहेत. तर सेनेचे उमेदवार संजय घाटगे आणि अपक्ष उमेदवार समरजित घाटगे पिछाडीवर पडले आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे राजेश पाटील आघाडीवर असून शिवसेनेचे संग्राम कुपेकर पिछाडीवर आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे आघाडीवर असून भाजपाचे सुरेश हाळवणकर पिछाडीवर पडले आहेत. तर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर आघाडीवर असून शिवसेना उमेदवार उल्हास पाटील आणि स्वाभिमानी चे सावकार मदानाईक पिछाडीवर पडले आहेत.

तर शिवसेनेसाठी महत्वाचा असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आघाडीवर असून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर पिछाडीवर पडले आहेत. तसेच शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर असून जनसुराज्यचे विनय कोरे पिछाडीवर आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे अशोक माने आघाडीवर असून शिवसेना उमेदवार सुजित मिंचेकर पिछाडीवर पडले आहेत. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे के पी पाटील आघाडीवर असून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर पिछाडीवर पडले आहेत.

Leave a Comment