कोळसे पाटील म्हणतात ” प्रकाशराव पुण्यात या उमेद्वाराला पाठिंबा द्या…”

0
51
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी चे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेद्वार विट्ठल सातव यांना घोषित केले असताना आता एक नवा पेच पुरोगामी मंडळीपुढे उभा राहिला आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड़ यांना पाठिंबा करिता अनेकांनी आंबेडकरांचे उंबरठे झिझवले आहेत.

सामाजिक आणि राजकिय गाढा अभ्यास असलेले आणि संघटनात्मक बांधणी अत्यंत खुबीने सांभाळणाऱ्या प्रविण दादा गायकवाड़ यांच्यासाठी माजी न्यायमूर्ति बी.जी.कोळसे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना पुण्यात लोकसभा मतदारसंघाचे तिकीट गायकवाड़ यांना मिळाले तर वंचित बहुजन आघाडी ने पाठिंबा  द्यावा अस आवाहन केलं आहे.

या प्रकरणी माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांताराम कुंजीर, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे इत्यादींनी आंबेडकरांशी चर्चा केली. या चर्चेत आंबेडकरांनी अत्यंत सकारात्मकपणे चर्चा झाली असल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आता या चर्चेनंतर आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here