konkan railway : शिमगो इलो, जाऊचा लागता…! रेल्वे विभागाकडून होळीसाठी विशेष गाड्यांचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

konkan railway : भारतातल्या मोठ्या सणांपैकी एक असलेला होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोकणात शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगा म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण ! चाकरमानी आवर्जून या सणाला कोकणात जातात. सणासाठी एक महिना आधी आरक्षण केले जाते. यावेळी रेल्वे गाडयांना मोठी गर्दी असते. आता हेच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने (konkan railway) १९ ते २७ मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

कधीपासून आरक्षण ? (konkan railway)

होळीसाठीच्या या विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने (konkan railway) कळविले आहे. कोकण रेल्वेने अहमदाबाद ते मडगाव जंक्शन या दरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद-मडगाव जंक्शन (०९४१२) ही विशेष साप्ताहिक गाडी अहमदाबाद जंक्शन येथून १९ आणि २६ मार्च असे दोन दिवस चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे, मडगाव जंक्शन-अहमदाबाद जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी मडगाव जंक्शन येथून २० आणि २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटणार आहे.

यास्थानकांचा असेल समावेश

मिळालेल्या माहितीनुसार या गाड्या वडोदरा जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, (konkan railway)वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, येथे थांबेल. कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.