केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट!! महागाई भत्त्यात केली तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार (Modi Government) देशाच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. मात्र आता मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA) करण्यात आली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत(DR) 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. खरे तर, निवडणुकीच्या तोंडावर आणि होळी सणाच्या अगोदर मोदी सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेईल अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात येत होते. त्यानुसारच आता मोदी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकराच्या तिजोरीवर 12,868 कोटी रुपयांचा भार वाढणार आहे.

आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. वाढवण्यात आलेला हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2024 पासून मिळणार आहे. म्हणजेच या भत्त्याची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच मार्च महिन्याच्या पगारात वाढीव भत्ता आणि जानेवारी – फेब्रुवारी महिन्यातील एरिअर कर्मचाऱ्यांना दिले जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ देशभरातील 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल.