हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता Kotak Mahindra Bank ने देखील आपल्या ग्राहकांना भेट देताना FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
नवीन दर 19 सप्टेंबर 2022 पासून लागू
Kotak Mahindra Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 19 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. Kotak Mahindra Bank चा एफडी कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान आहे. यामध्ये नियमित गुंतवणूकदारांना 2.5%-6.1% व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 3%-6.6% व्याज मिळते.
कोटक महिंद्रा बँक एफडी दर
7-14 दिवस – 2.50 टक्के 2.50 टक्के
15-30 दिवस- 2.65 टक्के 2.65 टक्के
31-45 दिवस – 3.25 टक्के 3.25 टक्के
46-90 दिवस – 3.25 टक्के 3.25 टक्के
91-120 दिवस – 3.75 टक्के 3.75 टक्के
121-179 दिवस – 3.75 टक्के 3.75 टक्के
180 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
181-269 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
270 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
271-363 दिवस – 5.00 टक्के 5.06 टक्के
364 दिवस – 5.25 टक्के 5.32 टक्के
365-389 दिवस – 5.75 टक्के 5.88 टक्के
390 दिवस – 6.00 टक्के 6.14 टक्के
391 दिवस – 23 महिन्यांपेक्षा कमी – 6.00 टक्के 6.14 टक्के
23 महिने – 6.10 टक्के 6.24 टक्के
23 महिने एक दिवस – 2 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
2 वर्षे – 3 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
3 वर्षे – 4 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
4 वर्षे – 5 वर्षांपेक्षा कमी – 6.10 टक्के 6.24 टक्के
5 वर्षे – 10 वर्षे – 6.10 टक्के 6.24 टक्के
RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला
अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. Kotak Mahindra Bank
अनेक बँकांकडून एफडी दरांमध्ये करण्यात आली वाढ
नुकतेच पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. Kotak Mahindra Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/rates/interest-rates.html
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न
PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा
Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा