Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता Kotak Mahindra Bank चे नाव देखील सामील झाले आहे.

Kotak Mahindra Bank Q1 profit rises 26 pc to Rs 2,071 cr | The Financial Express

17 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या वेबसाइट वरील माहिती नुसार, बँकेने व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 17 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या बदलानंतर आता बँक सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 7.20 टक्के व्याज दर देत आहे. पूर्वी तो 7.10 टक्के होता. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.40 टक्के व्याजदर दिला जातो आहे. याआधी 10 फेब्रुवारीला एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली होती. Bank FD

kokotak mahindra hikes fd rates

Kotak Mahindra Bank च्या वेगवेगळ्या कालावधीसाठीचे व्याजदर

आता बँकेकडून बँक 7-14 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 2.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के व्याज दिले जाईल. या बँकेकडून 4 वेगवेगळ्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.20 टक्के व्याज दर दिला जातो आहे. यामधील पहिला कालावधी 30 दिवसांचा आहे. यातील दुसरा कालावधी 391 दिवसांपासून 23 महिन्यांपेक्षा कमी, तिसरा कालावधी 23 महिने आणि चौथा कालावधी 23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी. यापेक्षा जास्त कालावधीसाठीचे व्याजदर कमी होत आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी कमीत कमी 3.25 टक्के तर जास्तीत जास्त 7.70 टक्के व्याज मिळेल. Bank FD

kotak mahindra hikes fd rates

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/rates/interest-rates.html

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये