Wednesday, February 8, 2023

वाळू चोरीच्या कारवाईनंतर कोतवाल व पोलिस पाटील यांच्या दुचाकी गाड्यांची मोडतोड ः तिघांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

खटाव | माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या टेम्पोंवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. वाळूने भरलेला टेम्पों व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. या कारवाईनंतर कोतवाल व पोलीस पाटील यांच्या दोन्हीही दुचाकी गाडीची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विशाल पोपट माने (रा. हिंगणी), दाजी शरद येडगे (दोघे रा. हिंगणी) व अनोळखी एका म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केला आहे.

याबाबत माहिती अशी की, हिंगणीचे कोतवालांना अवैद्य वाळू तस्करीची माहिती फोनवरून मिळताच पोलीस पाटील व कोतवाल यांनी हिंगणीकडे जाणाऱ्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा टेम्पो चालकाने वाहन पळून जाण्याच्या इराद्याने देवापूरकडे गेला. याची संपूर्ण माहिती माणच्या तहसीलदारांना देताच त्यांच्या आदेशानुसार सर्कल ऑफिसर उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी यांनी कालापट्टा देवापूर याठिकाणी जाऊन सदर वाहन ताब्यात घेतले.

- Advertisement -

माण गंगा नदीतून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. कारवाईत उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी, हिंगणीचे पोलीस पाटील व कोतवाल यांनी सहभाग घेतला.