सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण परिसर मंगळवारी रात्री भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या परिसरात आज (मंगळवार) रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.
कोयना धरण परिसरात झालेल्या या भूकंपाच्या केंद्रबिंदू कोयनानगर पासू 12.8 किलोमीटर वर होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवले असुन रात्री 9 वाजून 48 मिनटांनी कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
3.00 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का कोयनानगर येथील भुकंपमापकावर नोंदला गेला असुन भुकंपाचा केंद्र बिंदू कोयनाधरणापासुन 12.8 किलोमिटरवर
सांगली जिल्हयात वारणाखोऱ्यात चांदोलीच्या पश्चिमेला 8 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाची खोली जमिनी खाली 6 किमीवर आहे. भुकंपाने कोणतीही हानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती पाटण तहसिल कार्यालयाकडून देणेत आली आहे.